रविवार, २८ जुलै, २०१३

विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा



               विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा 
        सभेचं ठिकाण बदललं म्हणून मीच नव्हे तर मुंबैकर नाराज होते. या संदर्भात सबंधिताकडे नाराजी निषेधास्वरुपात व्यक्त केली. पण असे किती नाराजी चे सूर आळविले तरी उंटावर बसलेल्याना ऐकू थोडी जाणार …. संबधित या विषयी RMMS च्या जागेचे काम चालू आहे म्हणून खुलासा करताना दिसतात. RMMS चा हॉल सोडला तर अन्य जागा उपलब्ध नाही का ….? हि सभा नवी मुंबईत नेण्यामागची कारणे पत्रक बाजी आहे, सरळमार्गी संचालक आहेत . जो तळे राखिल तो पाणी चाखणार ……!!त्यात विशेष असं काही नाही. सर्व सुजाण सभासद त्यांचे पाणी चाखणे हे जाणून आहेत. तरी ठीक आहे, अन्य संस्थापेक्षा आपली संस्था बरी. गत  वर्षात काही संस्था संबधित  महाभागांनी संस्थेला गंडविन्याचा प्रकार उघडकीस आला. गंडविणारे आतल्या दरवाजाने घेतलेले कर्मचारी आणि PANEL वर घेतेलेले सुवर्ण व्यापारी
महासागरात थोड फार इकडं तिकडं झाल्याने संस्था अगदी घायकुतीला येत नाही . चहा   ...गरम  पिण्यातच  मजाएकदा  थंड  झालेला  चहा  परत  गरम  करून  पिण्यात  काही  मजा  नाही. . याच प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेत हा गरम विषय येणार …. विरोधक मजेमजेत हा तावातावाने बोलणार , पण शेपूट घालून कोणत्या बिळात लपून बसले  हे पत्रक बाज . कळून आले नाही . हिरमोड केला समस्त सभेचा . एखाद्या विषयाला विरोध करावा तो समोरूनपाठीमागून वार करून फायदा नाही . या संस्थेमध्ये आपल्या नोकरीवर गदा विरोधक आणतात म्हणून बहुतांशी संचालक नीवृत्त झालेत. आता पण जो या पत्रक बाजीत अग्रेसर आहे त्यांनी आयकर अन्य सरकारी खात्याकडून निनावी पत्रे लिहून काही संचालकांना अगदी जेरीस आणले  आहे. यदाकदाचित त्यांचा विकृत स्वभाव असावा किंवा तो मनोरुग्णजेणेकरून यातून त्याला समाधान पावत असेल  ह्यां बाबीस संपूर्णता जबाबदार संचालक आहेत . कर्ज कार्यप्रणाली अत्यंत चुकीची आहे. अन्य पतसंस्था, सहकारी बँका आणि राष्ट्रीय कृत बँका कर्ज प्रणाली कशी राबवितात यावर अभ्यास करणे गरजेचे आहे.  राष्ट्रीय कृत बँकेत सुवर्ण कर्ज देताना संबधित सोने व्यापारी वास्तविक मुल्य आणि सोने परीक्षण अहवाल सादर करतो तेव्हा सदर सोने एका पिशवीत बंद करून ते सिलबंद करून बँकेच्या हवाली करतो. त्यास तो पूर्णता जबाबदार असतो. गृह कर्जामध्ये TITLE SEARCH देणारा वकील जबाबदार असतो . यासाठी अभ्यासगट स्थापन करावा जेणेकरून भविष्यात अडचणी उदभवणार नाहीत